भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवट तो भला । माझा बहु गोड जाला

sevat to bhala | majha bahu god jala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥ आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥ परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥२॥ तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥