भजनी मालिका
← भजनांकडे परत

सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि

sainya jan hanse raya jalen kain | vasape to thayin apanasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥ आपणा आपण जाय सतीं जैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥ नाहीं याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥ वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसतो अवघीं हरी ॥४॥ हरीला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥५॥