भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि

seva te avadi uchcharaven nam | bhedabhedakam nivaruni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥ देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥ तुका म्हणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥