भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी

seviton ha ras vantiton anikan | ghya re houn naka ranabhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥