भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे

sevakasi adnya niropasi kam | svamiche te dharma svami jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥ भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥४॥ तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद करा ॥३॥