भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे

sevaken karaven sangitalen kam | sikyacha to dharma svami rakhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसां ॥ध्रु.॥ विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥ तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥