भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं

songen chhanden kanhin | dev jode aisen nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥ सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥ तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥