भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं

soniyachen tat kshirinen bharilen | bhakshavaya dilen shvana lagin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥ तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥