भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥ सर्वकाळ सुख माझिया मानसीं । राहिलें तयासी नाश नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥ इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुकलियां कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे ॥१॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मनत्वरे लागीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥ दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुख पंढरिये आलें । पुंडलिकें सांटविलें ॥१॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे हिडणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥ भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥ न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखाची वसति झाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम