भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही

sadhakachi dasha udas asavi | upadhi nasavi antarbahi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥ एकांती लोकांतीं स्त्रियांशीं भाषन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥ तुका म्हणे ऐसा साधनीं जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥