भजनी मालिका
← भजनांकडे परत

सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें

sapen jyasi khaven | tenen pranasi mukaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥ विंचु हाणी नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥२॥ तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥३॥