भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी

santa panchan tarin vachanan sevatin | nirop kan bheti ek tari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठुर केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥ तुका म्हणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥३॥