भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनाच्या काय कोटी । केल्या आटी होती त्या

sadhanachya kay koti | kelya ati hoti tya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधनाच्या काय कोटी । केल्या आटी होती त्या ॥१॥ देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥ केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥२॥ तुका म्हणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥३॥