भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें

sadhananchya kala akar akruti | karan navanitin mathanachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥ पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥ भक्तीची जोडी ते उखत्या चि साठी । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥ तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजि जाली धणी एकसरें ॥३॥