भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी

sadhak jale kali | gurugudichi lamb nali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥ पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥ अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥ चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भगपाळ ॥३॥ सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥ सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥