भजनी मालिका
← भजनांकडे परत

सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये

satadivasancha jari jhala upavasi | tarin kirtanasi takun naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥ शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्तनाचा रंग सोडों नये ॥२॥ तुका म्हणे ऐसा नामीं झाला निर्धार । तेथें निरंतर देव वसे ॥३॥