भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची

pindaposhakachya jalo dnyanagoshti | jhani drushtibheti na ho tyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र झाला ॥ध्रु.॥ पोहों नये कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥२॥ सिणलें तें गेलें सिणलियापासीं । झाली त्या दोघांसी एक गति ॥३॥ तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥४॥