भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों

punya phalalen bahutan divasan | bhagyaudayacha thasa | jhalo sanmukh to kaisa | santacharan pavalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदटलें पुढें । परब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥ आळिंगने संतांचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हे पाया । वरी त्यांच्या ठेवितो ॥२॥ तुका म्हणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥३॥