भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें जाणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती

pudhen janen labh ghade | ten chi vede nashiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढें जाणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥ येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥ होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥२॥ तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥