भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख

pudhiliya sukhen nimb detan bhale | bahut varalen hoy duhkh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥ खेळतां विसरे भूक तहान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥ तुका म्हणे पाळी तोंदिचीया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥