भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा

pudhen atan kaincha janma | aisa shram varesa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥ तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥