भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां

pudhen tari chitta | kay yeil ten atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥ मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥ कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥२॥ तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आतां ॥३॥