भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी

pudhen yete devi | tichi jati chalon dyavi | magil jhadavi | jhada man asadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥ मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥२॥ तुका म्हणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥३॥