भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं

pavitra sonvalin | ek tin cha bhumandalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥ तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥