भजनी मालिका
← भजनांकडे परत

पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं विषयांचे

pashu aise hoti dnyani | charvanin vishayanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं विषयांचे ॥१॥ ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥ केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥२॥ तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥