भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ

pavitra to deh vani punyavant | jo vade achyut sarva kal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥ काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥ तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥