भजनी मालिका

भजन

पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥

बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥ तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥