भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥ आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परउपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया॥१॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडी॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टी केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरी मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम