भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज ॥१॥ देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥ भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे ॥१॥ बुडतां देखती आणि कांसी डोळे । परि नुमजे अंधळे बळें होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्रीं जळ ॥१॥ एक मास येथें राहिलें निवांत । घरची तों मात न कळे कांही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय तें वैराग्य बोकडाचे परी । भलतीया भरीं पडतसे ॥१॥ काय ती समाधी कुकुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती ॥१॥ अधांपुढें दीप खरारी चंदन । सर्पा दुधपान करुं नये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥ पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय याचे मुखीं बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होतें ॥१॥ काय याचे कर्ण बधिर पैं वहिले । हरिकीर्तनीं जाहले पांगुळ ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥ जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये मुखीं रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्राहरी पंढरीये ॥१॥ ब्रह्मादिका जया ध्याती शिवादि वंदिती । ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ