भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती

kay napunsaka padminiche sohale | vanjhesi dohalen kainche hoti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती ॥१॥ अधांपुढें दीप खरारी चंदन । सर्पा दुधपान करुं नये ॥२॥ क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवुं नये ॥३॥ खळाची संगतेरे उपयोगासी नये । आपण अपाय त्याचे संगे ॥४॥ वैष्णवीं कृपथ्य टाकिलें वाकुळीं । एका जनार्दनीं तेचि भले ॥५॥