भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया वाचा आणि मन । एक करुनी करी भजन

kaya vacha ani man | ek karuni kari bhajan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काया वाचा आणि मन । एक करुनी करी भजन ॥१॥ हाचि मुख्य भजनभावो । सांडीं भेद अभेदाचा ठावो ॥२॥ मना धरुनियां शांती । प्रेमें भजें कमळापती ॥३॥ एका जनार्दनीं भजन । तेणें पावसी समाधान ॥४॥