भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया वाचा आणि मन । जयाचें ध्यान संतचरणीं

kaya vacha ani man | jayachen dhyan santacharanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काया वाचा आणि मन । जयाचें ध्यान संतचरणीं ॥१॥ तोचि पावन जाहला जगीं । दुजे अंगीं कांहीं नेणें ॥२॥ सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥ एका जनार्दनीं देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥