भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय जाणों विधि- । निषेधाचे ते बुद्धी

kay janon vidhi- | nishedhache te buddhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय जाणों विधि- । निषेधाचे ते बुद्धी ॥१॥ आम्ही गाऊं नाम मुखें । नाचुं सुखें कीर्तनीं ॥२॥ न पडो भलतिया भरीं । वाचे म्हणों हरिहरी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विधिनिषेध गेला पूर्ण ॥४॥