भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवंत जाय शेवटीं

kay manushyadehachen hoy | nashivant jay shevatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवंत जाय शेवटीं ॥१॥ हें तो काळाचें खाजें सहजी । कांहीं तरी राजी हरि करा ॥२॥ जाता आयुष्य न लगे वेळ । स्मरें घननीळ रामराणा ॥३॥ एका जनार्दनीं भाकी कींव । वायां हांव धरूं नका ॥४॥