भजनी मालिका

भजने

समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥ समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्यायाची लागे चिंता ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हांसती सकळ लाज कोणा ॥१॥ देव आप्त दैन्य उरे कैंचे बापा । आम्हांसि तूं कां पां विसरलासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥ आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समर्थासी करीं क्रोध हे अहंता । अखंड ममता मानी सदा ॥१॥ आपुली आपण व्यर्थ सांगे स्तुति । वडिलांची कीर्ति भोग सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥१॥ आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार ते ते वाढी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥ शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥ न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसें उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥ काया वाचा मनें भावें । संतांशीं शरण जावें । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समस्त भक्तमंडळीसहित वनमाळी । प्रवेशले राउळीं परमानंदे ॥१॥ राही रखुमाई सत्यभामा वेगीं । देवातें अष्टांगी नमस्कारिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समस्तां सांगती लहानालीं मुलें । नवल देखिलें आह्मीं आतां ॥१॥ वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासीं लागती कान्होबाच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समस्तांचें त्यानें केलें समाधान । सारिलें भोजन सक-ळिकीं ॥१॥ यशोदा आणि नंद देती अलंकार । कृपा दीनावर असों द्यावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समागमें असे हरी नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम