भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरीं

samarthasi nahin varnavarnabhed | samugri te sarva siddha gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥१॥ आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार ते ते वाढी ॥ध्रु.॥ न म्हणे सोइरा सुह्रद आवश्यक । राजा आणि रंक सारिखे चि ॥३॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥३॥ कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥ तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवा ॥५॥