भजनी मालिका

भजने

सर्पें दर्दुर धरियेला मुखीं । तोही मक्षिका शेखीं धरीतसे ॥१॥ तैसें ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सबळ करिती धंदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे बेडी ॥१॥ सर्पबाधेची सांकडीं । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्पे मुखींच धरिलें विष । मानुनि पीयूष अत्यादरें ॥१॥ आणिका डंखुनी वधवी प्राणा । तैसी त्या दुर्जना चाहाडी गोड ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्व काळ तुमच्या पदीं । मोक्ष मुक्ति रिध्दिसिध्दी ॥१॥ करिती भक्ताचे पाळण । जे जे ध्याती ह्रदयीं चरण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्व जिवां करी कारुण्य । वाचे सत्य उच्चारण । नित्य नामस्मरण । तोचि दास भगवंताचा ॥१॥ धन्य धन्य भूमंडळीं । धन्य धन्य साधुवचन पाळी । वेदमर्यादा वेगळी । कार्येम न करी सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ट । बोलतसे स्पष्ट वेद- शास्त्रीं ॥१॥ अच्युता अनंता माधवा मुकुंदा । गोपाळा गोविंदा गोपवेषा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्व देशीं सर्व जीवीं तो हरी । सर्वाठायीं सर्व भावें सर्व मुरारी ॥१॥ सर्व गांवी सर्व रुपीं भरुनी उरला । सर्व व्यापक सर्वां भूतीं तो व्यापला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥ म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्व पाप पुण्य हींचि दोन्ही भांडीं । विवेक न सांडीं येतां जातां ॥१॥ तुझें नाम तारूं तुझें नाम तारूं । तुझें नाम तारूं श्रीविठ्ठल ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥ ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ