भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा

samarthachen bal panghare vakal | hasati sakal lok kona

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥ समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्यायाची लागे चिंता ॥२॥ जरी तुज कांहीं होईल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥३॥