भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड

samarthansi ranken shikavan jaishi | majhi vani taishi badabad

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥ शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥ उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥ चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥