भजनी मालिका

भजने

सदोदीत गाय श्रीराम गुण । धन्य तो पावन नरदेहीं ॥१॥ नरदेहीं आलीया रामनाम गावें । तरीच जन्मा यावें गुरुपुत्रा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सद्गदित कंठ बाष्प पैं दाटत । जया भेटिलागीं हृदयें फुटत ॥१॥ तो देखिलावो तो देखिला । सबाह्म अभ्यंतरीं व्यापुनियां राहिला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सद्गुरुकृपा वोळली तयां । जे पंढरीराया अनुसरले ॥१॥ भक्ति ज्ञान वैराग्यशीळ । शांति अढळ निवैंरता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सद्‌गुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावेंज वृत्तिसहित ॥१॥ डोळियाचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सद्‌गुरुनायकें पूर्ण कृपा केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥ माझें सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सद्‌गुरुवांचुनी नाम न ये हातां । साधन साधितां कोटी गुणें ॥१॥ जैसा कांतेविण करणें संसार । तैसा हा व्यापार साधनांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचकु प्रणव अवघा ॥१॥ कैसी संध्येसी साधिली संधी । देहीं हारपली देहबुद्धी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सनकादिक म्हणती देवा । भुललेति भावा भक्तांच्या ॥१॥ तरी जे येथें दर्शना येती । दयावी त्यां मुक्ति सायुज्यता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सनकादिक वेडे । शुक नागवे उघडे । भुलविले रोकडे । जडभरतासी ॥१॥ पुंडलिकें जगजेठी । उभा केला वाळुवंटी । अद्यापि पैं नुठी । धरणें त्याचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सन्मानुनी ब्राम्हण राज्यीं बैसविले । चित्त आनंदले सुदाम्याचें ॥१॥ तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी । द्वारकेसम पुरी पोह्यांसाठी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सन्मुख देखोनियां भेटी धांवा । तंव दशादिशा उचलल्या खेंवा ॥१॥ आतां नवल भेटी देव । पुढें आलिंगितां सर्वांगी खेंव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ