भजनी मालिका
← भजनांकडे परत

समस्तांचें त्यानें केलें समाधान । सारिलें भोजन सक-ळिकीं

samastanchen tyanen kelen samadhan | sarilen bhojan sak-likin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समस्तांचें त्यानें केलें समाधान । सारिलें भोजन सक-ळिकीं ॥१॥ यशोदा आणि नंद देती अलंकार । कृपा दीनावर असों द्यावी ॥२॥ गोपाळ गौळणी पुसती उद्धव । मिळोनियां सर्व बोळ-विती ॥३॥ पक्षी श्वापदांसी सांगत उद्धव । असों द्यावा भाव कृष्णापायीं ॥४॥ आला मथुरेसी सांगे वर्तमान । नामा ह्मणे धन्य श्रोते वक्ते ॥५॥