भजनी मालिका
← भजनांकडे परत

समस्तां सांगती लहानालीं मुलें । नवल देखिलें आह्मीं आतां

samastan sangati lahanalin mulen | naval dekhilen ahmin atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समस्तां सांगती लहानालीं मुलें । नवल देखिलें आह्मीं आतां ॥१॥ वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासीं लागती कान्होबाच्या ॥२॥ यशोदेचे मनीं झालासे विवेक । वैकुंठनायक येथें आला ॥३॥ नामा ह्मणे तिशीं घालितसे घाला । अपराध तिजला काय असे ॥४॥