भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थी घरीं काम । करितां हातीं लागे दाम

samarthi gharin kam | karitan hatin lage dam

रचनाकार: संत निळोबा · अभंग
समर्थी घरीं काम । करितां हातीं लागे दाम ॥१॥ काय देईल भिकारी । कोण सेवा त्याची करी ॥२॥ जाती तया घरा । जेथें लक्ष्मीचा वारा ॥३॥ निळा म्हणे हीना । आड ठाकिली कल्पना ॥४॥