भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये

sada vache namavali | nitya jivha jyachi chali | patakanche holi | hot tene keli ye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥ नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥ उपमा नव्हे तया नरा । जनार्दन तो निर्धारा । एका जनार्दनीं बरा । त्याचा सांगात घडतां ॥३॥