भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा परिपूर्ण

sada paripurna

सदा परिपूर्ण । तो हा जनार्दन । नित्य जपता नारायण । कोटि याग घडतील ॥१॥ एवढा महिमा नामाचा । काय मंत्र जपसील वाचा । जो विठ्ठल म्हणे तो दैवाचा । ऐसा ब्रह्मा बोलें पूर्वीं ॥२॥ तो नित्यकाळ पंढरी । आणि देव तेहतीस कोटी । वृक्ष जाले निरंतरी । उध्दार करावया कुळाचा ॥३॥ एवढें क्षेत्र पांडुरंग । तेथें उध्दरिलें हें त्रिजग । आनंदत ब्राह्मण याग । कोटिकुळें उध्दरती ॥४॥ कीर्तन केलीया वाळवंटी । घेतां वैष्णवांची भेटी । होईल संसाराची तुटी । चरणरज वंदितां ॥५॥ तुळशीच्या माळा । घालितां हरिदासाच्या गळां । तो न भिये कळिकाळा । त्यासी जिव्हाळा हरिविठ्ठल ॥६॥ पंढरीसी जाऊं म्हणती । तयांकडे यम न पाहती । तयांचे पूर्वज उध्दरती । म्हणती वैकुंठा जाऊं आतां ॥७॥ देव जाणे ऐसा । तोचि हरिदासा भरंवसा । ज्ञानदेव म्हणे परियेसा । थोर पुण्य तयाचे ॥८॥