भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्याक्षरें माझी वाणी । प्रवर्तली गुणीं तुमचिया

satyaksharen majhi vani | pravartali gunin tumachiya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सत्याक्षरें माझी वाणी । प्रवर्तली गुणीं तुमचिया ॥१॥ दाविले ते तुम्हीं अर्थ । वोळी यथार्थ मांडियेले ॥२॥ नाहीं कांहीं मतांतरीं । वदली वैखरी हे माझी ॥३॥ निळा म्हणे हे वाकयपूजा । गरुडध्वजा प्रत्यर्थ ॥४॥