भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे

satya map vadhe | gabalachi chali khode

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥ उत्तरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥ घरामध्ये राजा । नव्हे हो पट्ट पूजा ॥२॥ तुका म्हणे साचें । रूप तें दर्पणीचें ॥३॥