भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदगुरु निवृत्ति दिसतो घनदाट

sadaguru nivrutti disato ghanadat

सदगुरु निवृत्ति दिसतो घनदाट । सुषुप्तीचा घांट वेधतांची ॥१॥ आत्मामाया शिव शक्तीचे हें रुप । दिसतें चिद्रुप अविनाश ॥२॥ ज्ञानदेव चढे ऐसी वाट देख । आकाशीं असे मुख तिचें कैसें ॥३॥