भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यासाठीं माझी चाली । संती केली आज्ञा ते

satyasathin majhi chali | santi keli adnya te

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सत्यासाठीं माझी चाली । संती केली आज्ञा ते ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणों मुखें । वाणूं सुखें गुण त्याचे ॥२॥ काय आम्हां दासा चिंता । धणी पुरवितां शिरावरीं ॥३॥ निळा म्हणे निश्चतीनें । असों वचनें एकाचिया ॥४॥