भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्रावीचा खेळ लक्षवेना कवणा

satravicha khel lakshavena kavana

सत्रावीचा खेळ लक्षवेना कवणा । ब्रह्मादिकां जाणा अगम्य तें ॥१॥ रात्रंदिवस मन चपळत्त्वें धांवतें । तेंही सत्रावीतें नपवेची ॥२॥ सत्रावी अगम्य विधि हरिहरां । लक्षूं पहातां वरा गोविंदु गे ॥३॥ ज्ञानदेव दर्शन सत्रावीचें घेतां । उन्मनी ठसवी निवृत्तिराज ॥४॥